spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राहुल गांधींच्या नव्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड

काँग्रेस नेते राहुल गांधी हे साध्य चर्चेत यातना दिसत आहे. स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल काढलेले उदगार त्यावरून संपूर्ण राजकारणात जणू काही वादळ निर्माण झाला होता. राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते नवनवीन वक्तव्यं करत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे साध्य चर्चेत यातना दिसत आहे. स्वातंत्रवीर सावरकरांबद्दल काढलेले उदगार त्यावरून संपूर्ण राजकारणात जणू काही वादळ निर्माण झाला होता. राहुल गांधी हे सध्या लंडनमध्ये आहेत. तिथून ते नवनवीन वक्तव्यं करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत कारण त्यांचं नवं वक्तव्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विहिंपने टीका केली आहे.

ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. भाजपानंतर आणि नरेंद्र मोदींनंतर आता राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यानाच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. इजिप्तमधली कट्टर संघटना मुस्लीम ब्रदरहुडसोबत राहुल गांधींनी संघाची तुलना केली आहे. संघाची स्थापन अशा पद्धतीने करण्यात आली आहे जशा पद्धतीने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड स्थापन झालं होतं. लंडनमधल्या थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. RSS ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे. या संघटनेने भारतातल्या काही संस्थांवरही कब्जा केला आहे. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड आहे त्याप्रमाणे भारतात RSS आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की भाजपाला कुणी हरवू शकत नाही. त्यामुळे आता भारताच्या राजकारणात नव्या चर्चाना उधाण येणार आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण होणार आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राहुल गांधींवर टीका केली आहे. महामंत्री सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी हे आपल्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करू इच्छित आहेत. राहुल गांधी यांचं वर्तन हे एखाद्या टूलकिट प्रमाणे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राष्ट्रभक्त आहेत. त्यांची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे असंही सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सोडले शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने शिंदे गटाच्या अपात्र मुद्द्यावर नवा ट्विस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss