राजकीय वर्तुळात आता येणार नवे वळण ; Vasant More घेणार ठाकरेंची भेट !

हे वळण आता कोणत्या रस्त्यावर घेऊन जाते ते पाहावे लागणार आहे. हाती आलेल्या बातमी नुसार वसंत मोरे आता तिसऱ्यांदा आपला रास्ता बदलणार आहेत अशी चर्चा राजकीय विश्वात घडत आहेत. एकंदरीत राजकीय वर्तुळात युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्यच असते.

राजकीय वर्तुळात आता येणार नवे वळण ; Vasant More घेणार ठाकरेंची भेट !

राजकीय नाट्यात नवे नवे बदल घडत आहे. काही नवनवीन घडामोडी जनतेच्या निद्रशनास येत आहेत. आता पर्यंत चाललेल्या राजकीय नट्यात आता आले आहे नवे वळण. हे वळण आता कोणत्या रस्त्यावर घेऊन जाते ते पाहावे लागणार आहे. हाती आलेल्या बातमी नुसार वसंत मोरे आता तिसऱ्यांदा आपला रास्ता बदलणार आहेत अशी चर्चा राजकीय विश्वात घडत आहेत. एकंदरीत राजकीय वर्तुळात युद्धात आणि प्रेमात सर्वकाही क्षम्यच असते. असे वातावरण राजकारणात निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. वसंत मोरे हे विशेष चर्चेत राहिलेले आहेत.

बऱ्याचदा एकाच पक्षात असूनसुद्धा त्यांनी मनसे किंवा आतील नेतेमंडळी यांचा जाहीर निषेद केला आहे.  सुरुवातीला त्यांनी मनसे मधून काही निवडणूक लढवल्या त्यांनतर त्यांनी बहुजन विकास आघाडी चे बोट पकडत पुढील निवडणूक लढवली होती. त्यांनतर काही कालांनंतर त्यांनी पुन्हा मनसेमध्ये यू टर्न मारला होता. या सर्व दरम्यान मनसेचा एक उपक्रम होता ज्यात मनसेने मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न मांडला होता त्यावेळी मोरे यांनी त्याचा जाहीर निषेद नोंदवला होता. त्यांनतर त्यांची पुणे मनसे शहर अध्यक्ष पदावरून तातडीने उचल बांगडी झाली होती. त्यांनतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते की ते लवकरात लवकरच मनसेला शाल श्रीफळ देतील.

अश्यातच आता मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. परंतु महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

याच पर्शवभूमीवर वसंत मोरे (Vasant More) आता पुण्यातील आज म्हणजेच ४ जुलै २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. ही भेट आज मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या भेटीत काय नवीन वृत्त समोर येते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे ही वाचा:

T20 WORLD CUP : TEAM INDIAN चे ४ जुलै २०२४ चे वेळापत्रक असणार ‘असे’ ; जाणूयात सविस्तर

 
THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version