मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षेत घट; नार्वेकर आणि आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ

मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षेत घट; नार्वेकर आणि आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ

महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राजकारणात काही महत्वाची गणितं जमतात का? जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही गणितं जमतात का? याची चर्चा सुरु झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हाही चर्चेचा विषय आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये विविध मुद्द्यावर वाद झालेले पाहायला मिळत होते. आता महाविकास आघाडीमधील अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा समावेश आहे.

या नेत्यांची सुरक्षा केली कमी.

वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, नगरहरी झिरवळे, सुनील केदारे, डेलकर परिवार

हे ही वाचा :

पाकिस्तानच भविष्य भारताच्या हाती; पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये आता भारतच पोहोचवू शकतो

भाजप नेत्यांची महाराष्ट्राचे नुकसान होताना मोदी सरकारसमोर ब्र काढण्याची हिंमत; सचिन सावंत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version