ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सध्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुण्यात पुणे पोलिसांचा चांगलाचा क्लास घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना कश्या पद्धतीने काम करावं लागणार आहे, हे सुद्धा सांगण्यात आलं. आजच्या बैठकीत शहरातील विविध गुन्ह्यांची ( various crimes) परिस्थिती काय आहे? याचा आढावा घेण्यात आला. २०२२ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आल्याच देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) झालेल्या राजकीय नाट्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. ऐनवेळी काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. एबी फॉर्म असूनही त्यांनी अर्ज भरला नाही. मात्र, त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. सुधीर तांबे यांनी मुलाचा विजय सोप्पा व्हावा म्हणून ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपची या खेळीला फूस असल्याचीही चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच नाशिकची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. तर, योग्यवेळी योग्य गोष्टी कळतील, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महसूल अधिकारी (Revenue Officer), पोलीस (Police) आणि लोकप्रतिनिधी यांचे अवैध युती आहे. सर्व प्रकारच्या पैशावर ही युती कब्जा करते. गोवंश हत्या पोलीस स्टेशनला माहिती असताना होते. कायदा करून काय उपयोग? हप्ता घेऊन गोवंश हत्या केली जाते. वरिष्ठ अधिकारी बाहेर पडत नाही. त्यांनी बाहेर पडले पाहिजेत, अशा शब्दात फडणवीस यांनी पोलिसांची कान उघाडणी केल्याचं कळतं.

हे ही वाचा:

money saving tips, तुमचा पगार येताच सर्व पैसे होत आहेत खर्च? तर वापरा बचतीचा ‘हा’ फॉर्म्युला

माझी आयपीएल अध्यक्ष ललित मोदींची तब्येत पुन्हा बिघडली, कोविडमुळे रुग्णालयात केले दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version