spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मनसेकडून केला खास व्हिडिओ शेअर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मनसे अधिकृत (MNS official) या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत राज ठाकरेंच्या भाषणातील एक छोटासा भाग असून शिवसेना सोडतानाच बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा एक किस्सा आहे.

 या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या बरोबरचे काही आठवणी सांगत आहेत. राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला याची आठवण करून देणारा हा व्हिडीओ आहे. शिवसेनेमधून ज्यांनी-ज्यांनी बंड केलं त्यांच्यापेक्षा आपली भूमिका कशी वेगळी होती हेही या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. तर, व्हिडिओसोबत राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांसोबत अखेरचा ‘राज’कीय संवाद, असं कॅप्शन दिलं आहे. राज ठाकरे पक्ष सोडताना बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्याच्यात झालेलं संभाषण राज ठाकरे यांनी एका सभेत सांगितलं होतं. त्याच सभेतील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मनसेनं ट्विट केली आहे. ‘मला आजही ती गोष्ट आठवते. जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही राहत नाही आता पक्षात. माझी शेवटची भेट होती. या आधी मी कधी बोललो नाही तुमच्याशी ही गोष्ट,’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ‘मी निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होती. मनोहर जोशी खोलीच्या बाहेर गेले. तेव्हा माननीय बाळासाहेबांनी मला बोलावलं. माझ्यासमोर हात पसरले माझ्यासमोर मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा, त्यांना समजलं होतं,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

आजोबांची जयंती आदित्य ठाकरे विसरले, केली मोठी चूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss