खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे खळबळ जनक ट्वीट

खोटे गुन्हे दाखल केल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांचे खळबळ जनक ट्वीट

मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर ठाणे कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात झाली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेनं आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याविरोधात जितेंद्र आव्हाड कोर्टात धाव घेणार आहेत. याबाबतचे आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

साई रिसॉर्टच्या मुद्यावर अनिल परब सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार

ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले, “माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात ७२ तासांत दाखल करण्यात आले. उद्या या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. यात त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रं बनवतात”

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर गाडयांना मालगाडीच्या बोगी जोडण्यात याव्यात, सुप्रिया सुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतीत काय घडलं होत?

मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमावेळी गर्दीत आव्हाड यांनी एका महिलेला धक्का दिल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय भाजप महिला नेत्यांनी केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर किरीट सोमय्यांचा हातोडा पडणार का? दापोलीतील राजकीय वातावरण तापलं

Exit mobile version