Maharashtra Assembly Winter Session 2022 विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज पाचव्या दिवशी विरोधकांनी आंदोलन तर केलेच पण त्याच बरोबर आणखी एक घटना विधानमंडळाच्या गेटवर घडली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2022 विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Maharashtra Assembly Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज पाचव्या दिवशी विरोधकांनी आंदोलन तर केलेच पण त्याच बरोबर आणखी एक घटना विधानमंडळाच्या गेटवर घडली आहे. राज्यात महापुरुष आणि संतांचे अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसून राज्य सरकारने याबद्दल मौन बाळगल्याचा आरोप करत एका महिलेने नागपूर विधिमंडळाच्या गेटवर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संतांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता… वारकरी संप्रदायाचा अपमान करता… तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही.. तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही… शिवाजी महाराज की जय.. बाबासाहेब आंबेडकर की जय… अशा घोषणा देत अचानकच या महिलेने विधानभवनाच्या मुख्य दारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतलं. तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि पुढील अनर्थ टळले. सध्या नागपूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे.

राज्यभरात महापुरुषांचे अपमान करण्याची स्पर्धाच सुरु असून यावर राज्य सरकार बोलायला तयार नसल्याचे आरोप करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. तसेच दररोज राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ आदी घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला होता.

हे ही वाचा:

IPL 2023 च्या मिनी लिलावासाठी सर्व सज्ज.. BCCI ने स्टार हॉटेलमध्ये केले दोन मजले बुक

IPL 2023 Mini Auction मध्ये दिसणार सनरायझर्स हैदराबादचा लक्ष्यवेधी चेहरा, जाणून घ्या नक्की कोण आहे हा चेहरा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version