spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aadity Thackeray Live, स्वःताला खोके, महाराष्ट्राला धोके, खोके सरकारचं नवीन धोरण, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहेत. यावेळी ते म्हणले गेल्या ६ महिन्यांपासून मोघलाई आपल्या राज्यात सुरु आहे. गणपती मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायरिंग करण्यात आली. तसेच सत्ताधारांच्या आमदारांच्या बंदुकीतुनच गोळी चालवली. परंतु तरीदेखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही झाली नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं कि,”स्वःताला खोके, महाराष्ट्राला धोके” हे महाराष्ट्र सरकारच नवीन धोरण आहे. त्याचबरोबर स्मोक स्क्रीन निर्माण करून त्याच्या आडून मुंबई महापालिकेची लूट या सरकारकडून केली जात आहे. काही महिन्यापूर्वी या सरकारने काढलेल्या रस्त्याच्या टेंडरला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना हे टेंडर रद्द करावं लागलं. त्यानंतर आता ४०० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ६०८० कोटी रूपयांचं नवीन टेंडर काढण्यात आले आहे. तसेच या टेंडमधून कंत्राटदारांना ४८ टक्के फायदा करून देण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या नवीन रस्ते टेंडरमुळे कंत्राटदारांचा कसा फायदा झाला हे देखील सांगितले. यावेळी ते म्हणाले,”मुंबईमध्ये कामं करण्याचा फेअर कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो. कारण उर्वरित काळात पाऊस असतो. यामुळे पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामे ही पावसाळ्याआधी पूर्ण व्हावी लागतात. परंतु, मग आता हाती घेतलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतील का याचा यांनी अभ्यास केला नाही. तसेच यामध्ये कंत्राटदारांचा ४८ टक्के फायदा सरकारकडून करून देण्यात आला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्र्यांना कशाप्रकारे मुंबईमध्ये काम चालत हे देखील माहित नाही, असा देखील आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना आदित्य म्हणाले,”मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही. महापालिकेत कोणती बॉडी, महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली?” असा सवाल यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. तसेच पुढे ते म्हणाले,”टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत?”, असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

दरम्यान, राज्यात मोघलाई आल्यासारखं वाटत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये दादर पोलीस स्टेशन च्या बाहेर आलेल्या गोळीबार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळी निघाली होती, यावरही भाष्य केलं.त्यावेळी ते म्हणाले,”गणपती मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरी देखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात झाले आहेत. परंतु, कोणावरच अजून कारवाई झालेली नाही. गेल्या सहा महिन्यात आम्ही सतत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहोत. परंतु, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे धोरण सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर राज्यपालांनी महापुरुषांविषयी केल्या वक्तव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले,”अनेकवेळा महापुरूषांचा अपमान दरून देखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय,” असंही आदित्य ठाकरे बोलले.

आता आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे.

 

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांनी केला मोठा दावा, कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाला

U-19 World Cup भारताच्या अंडर-१९ महिला संघात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे – सचिन तेंडुलकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss