Thursday, September 26, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

मुंबई आणि परिसरात काल (बुधवार, २५ सप्टेंबर) झालेल्या धुवाधार पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे तीनतेरा वाजले. मुंबई आणि ठाण्यात काहि ठिकाणी पाहणी साचल्यामुळे नागरिकाना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले. यावरून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत,”एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कुठे होते?’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, “काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई, पुणे, ठाण्यातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाचा पावसात मुंबई ठप्प झाली. २००५ साली ९०० मिलीमीटर पाऊस झाला होता. काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेदेखील ठप्प झाला. रेल्वे ठप्प झाल्या. असे सटाणा घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कुठे होते? मुख्यमंत्री मुंबई खड्डेमुक्त करणार होते. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. पण अर्धा किलोमीटरदेखील काम पूर्ण नाही. मुख्यमंत्री पत्रकारांना विचारत होते काही पाणी भरा है क्या? आणि पाणी भरलं. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खात आहे त्याद्वारे प्रशासन सुरू आहेत. एवढे घटनाबाह्य मुख्यमंत्री कोणी बघितले नसेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र लुटला. पुणे लुटले. ठाणे लुटले. आमची मुंबई लुटली. नॅशनल हायवे असो वा गल्लीतले रस्ते, सर्व बेकार केले. तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं. काल हिंदमाता येथे पाणी भरायला नको होते; आम्ही आमच्या काळात ठिकठिकाणी पंप लावले होते, ब्रिमस्टोवॅड होते. काल एकतरी अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? १५ सहायक्का आयुक्त नाहीत वॉर्ड ऑफिसर नाहीत. यांचेच लोक सगळीकडे भरले आहे. एवढं भयानक काम याआधी कधी पाहिलेलं नव्हत. मुंबई, ठाणे, पुण्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “घाटकोपर मेट्रो स्थानकाला काल बंदोबस्त दिला होता का? सगळे पोलीस यांच्या बंदोबस्तात असतात. काल सगळ्या संस्था होत्या कुठे? या राजवटीची प्राथमिकता ही पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर राहिली आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द केला आहे पण सामान्यांना जो त्रास झाला त्याच काय? भाजपने सांगावं की पुणे आपल्याच देशात आहे परदेशात नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Mahayuti ला परतीच्या पावसाने झोडपले, मुंबईत शरमेची बाब!

Jairam Ramesh यांचे PM Narendra Modi यांच्यावर टीकास्त्र, पुणे दौऱ्याआधी उपस्थित केले ‘चार’ मोठे सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss