सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा (Mumbai University Senate Election) निकाल काल (शुक्रवार, २७ सप्टेंबर) जाहीर जाहीर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा (Yuva Sena) वरचष्मा दिसून आला. १० पैकी १० जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. सकाळी ९ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात आला. मतमोजणीनंतर युवासेनेने सर्वच्या सर्व जागा काबीज केल्याचे स्पष्ट झाले. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून आता आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) हे आपले लक्ष्य असल्याचे अधोरेखित केले आहे.

सिनेट निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना भवन आणि मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. या जल्लोषात रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे यांच्यासह विजयी उमेदवार आणि अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून आनंद साजरा केला. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत ‘सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे,’ असे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

उपस्थितांशी संवाद साधत आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, “सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. विजय काय असतो हे काल दाखवून दिलेलं आहे. करून दाखवलं आहे. आणि हि सुरुवात आहे. असाच विजय आपल्याला विधानसभेत मिळवायचा आहे. त्याची हि सुरुवात आहे. १० पैकी १० जागा निवडून आले आता शांत बसणार नाही. सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे. सगळ्यांचे अभिनंदन करतो, ही विजयाची सुरुवात आहे,” असे ते म्हणाले.

वरुण सरदेसाई यांचे केले कौतुक

आदित्य ठाकरे यांनी यावेळी वरुण सरदेसाई यांचेही कौतुक केले. ते यावेळी म्हणाले,”वरुणचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर्व गणित वरुण मांडत असतो. मी परवा चिडवत होतो कि वरुण स्थगिती येईल बघ. आपल्या सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. आपण दोन वर्षांपासून काम करत आहोत. आपण विभागप्रमुखांना सर्वांना फोन करून पदवीधरांची नोंदणी करून घ्यायला सांगितलं होता. हे चाळीस गद्दार होते. तेवढी नोंदणी झाली नाही ती यावेळी झाली. मिंधे सरकारने नोंदणी रद्द केली. ती त्यांनी १३ हजारांवर आणली. आपल्याला ९० टक्क्यांहून अधिक माती मिळाली आहेत. या पदवीधरांचा विश्वास एकाच नावावर आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे….” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Dharmaveer 2 सिनेमावर वाद, सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, म्हणाले…

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version