spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हणणाऱ्या आपच्या नेत्यावर स्मृती इराणी संतापल्या म्हणाल्या, ‘हे तोंडाचं गटार…’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चांगलंच सुनावलं आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असताना स्मृती इराणी यांच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी यांनी आपचे नेते गोपाल इटालिया यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे, ज्यामध्ये ते ९९ वर्षीय हिराबेन मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. यानंतर स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला असून, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा विनाश होईल असं म्हटलं आहे.

Andheri East Bypoll 2022 : मुरजी पटेल हे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंशी लढत

आम पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या ट्विटमध्ये इराणी म्हणाल्या, “गटर तोंड गोपाल इटालिया आता हिरा बा यांना तुमच्या आशीर्वादाने शिव्या देत आहे. मला कोणताही आक्रोश वाटत नाही, मला गुजराती किती नाराज आहेत हे दाखवायचे नाही, परंतु हे जाणून घ्या की तुमचा न्याय झाला आहे आणि तुमच्या पक्षाचा गुजरातमध्ये निवडणुकीत पराभव होईल. आता जनताच न्याय देईल.” असे त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Monsoon : राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी, उद्यापासून उघडीपीची शक्यता

आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, “गुजरातमधील पराभवाच्या भीतीने तुम्ही इतके घाबरले आहात की, तुम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा जुना व्हिडिओ प्रसिद्ध करत आहात, जेव्हा ते ‘आप’चे सदस्यही नव्हते. , आता त्याला टार्गेट करण्यासाठी कारण तो गरीब कुटुंबातून आणि पाटीदार समाजातून आला आहे.”

दोन वर्षांपूर्वी गोपाल इटालिया यांनी आपचे संयोजक म्हणून निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. २०१८ मधील व्हिडीओवरुन ही चौकशी होणार आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमिल मालविया यांनी रविवारी हा व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये गोपाल इटालिया नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच व्यक्ती’ असा केला होता.

राशी भविष्य ऑक्टोबर २०२२, आज पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल

Latest Posts

Don't Miss