spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदींना आम आदमी पार्टीने दिला पाठिंबा

सध्या राजकारणात नवीन घटना घडत असताना आता मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात दिसणारे काही नेते मंडळी शिंदे फडणवीस सरकार सोबत असणाऱ्या घटना घडत आहे.

सध्या राजकारणात नवीन घटना घडत असताना आता मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात दिसणारे काही नेते मंडळी शिंदे फडणवीस सरकार सोबत असणाऱ्या घटना घडत आहे. तुयाचबरोबर सरकारच्या राज्यात काही ठोस नियम लागू करणार अशा देखील चर्चा होताना दिसत आहेत. तर शिंदे फडणवीस सरकारने समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असताना बघायला मिळत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मांडलेल्या या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. आम अंडमोई पक्षाचे अरविंदे केजरीवाल यांनी सामान नागरी कायद्याला मान्यता देत असून त्यांनी हि माहिती सांगितली आहे.

आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) समान नागरी कायद्याचं तत्वाच्या आधारे समर्थन केलं आहे. सर्व धर्मांशी चर्चा करुन सहमतीनेच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो, हा कायदा असावा असं घटनेच्या कलम ४४ मध्ये देखील लिहिलं आहे. मात्र सर्व धर्मियांची याला संमती हवी. हेही तितकेच खरे आहे. या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकीय पक्षांशी चर्चा झाली पाहिजे. सर्व महत्वाच्या आणि जाती धर्मियांच्या बैठकी घेऊन या संदर्भात चर्चा करून यावर तोडगा काढायला हवा. तसेच प्रत्येक पक्षाच्या आणि जाती धर्मांच्या श्रेष्टींची सर्वांच्या संमतीनंतरच या नव्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी आपची भूमिका आहे, असं संदीप पाठक यांनी सांगितलं आहे. एकीकडे समान नागरी कायद्याला तत्वत: समर्थन देताना आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी यूसीसीबाबत केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा भाजप गुंतागुंतीचे आणि जटील मुद्दे घेऊन येतात, असं आप नेते संदीप पाठक म्हणाले.

त्याचबरोबर पाठक पुढे म्हणाले, ‘समान नागरी कायदा लागू करणं आणि हा प्रश्न सोडवावा याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. देशात फूट पाडून निवडणुका लढवता याव्यात यासाठी भाजप केवळ गोंधळाची स्थिती निर्माण करते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात काम केलं असतं तर कामाला पाठिंबा मिळाला असता, पंतप्रधानांना कामासाठी पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे ते समान नागरी कायद्याचा आधार घेणार, अशी टीकाही संदीप पाठक यांनी केली.दरम्यान समान नागरी कायदा आणणे हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायदा आणण्याचा प्रकार आहे, असंही त्यांनी म्हटलं.समान नागरी कायद्याचं महत्वाचे मुद्दे हे असलेच पाहिजे त्यामध्ये देशाच्या घटनेत मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. तर मार्गदर्शक तत्वांचं पालन सरकारकडून अपेक्षित असतं, ती बंधनकारक नसतात. देशात सर्वधर्मीयांसाठी क्रिमिनल लॉ एकच आहे, पण पर्सनल लॉ मात्र वेगवेगळा आहे. त्यामुळे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी यांचे विवाहाबद्दलचे, घटस्फोटाबद्दलचे, वारसाहक्काबदलचे, दत्तकविधानाबद्दलचे कायदे वेगळे आहेत. त्या त्या धार्मिक समजुतींनाही या पर्सनल लॉमध्ये विशेष स्थान आहे. पण समान नागरी कायदा आल्यास या सगळ्यामध्ये समानता येईल.

हे ही वाचा:

देशामध्ये बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

दुबईच्या मॉलमध्ये फिरतात Alia – Ranbir… फोटो होतोय तुफान व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss