“संजय राठोडची आरती करावी”… पूजा चव्हाणच्या आजीचा संताप व्यक्त

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला आणि यामध्ये इतर मंत्र्यांसह संजय राठोड यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपत घेतली. यासर्व प्रकरणी त्यांच्यावर चित्रा वाघ यांनी टीका देखील केली होती.

“संजय राठोडची आरती करावी”… पूजा चव्हाणच्या आजीचा संताप व्यक्त

मुंबई :- राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला आणि यामध्ये इतर मंत्र्यांसह संजय राठोड यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपत घेतली. यासर्व प्रकरणी त्यांच्यावर चित्रा वाघ यांनी टीका देखील केली होती. परंतु आता “या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल”, असा टोला पूजा चव्हाण हिच्या आजीने लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना स्थान देल्यामुळे पूजा चव्हाणच्या आजीने नाराजी व्यक्त केली आहे.

पूजा चव्हाण या तरुणीची आजी शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने संताप व्यक्त केला आहे. “खरं तर एका मुलीची आब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढं ऐकून सुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो. आरती करावी त्याची या (शिंदे-फडणवीस) सरकारने. त्याची पुजा करा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल,” असा टोलाही शांताबाई यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. तसेच “आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही. ज्या पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं आहे हे दुर्दैवी बाब आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे,” असं शांताबाई यांनी म्हंटले आहे. पुढे “हा (राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय) महिलांचा अपमानच आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खूनी आहे खूनीच आहे,” अशी टीकाही शांताबाई यांनी केली.

“पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील,” असं म्हटलं आहे.

 

हे ही वाचा :-

लाल सिंग चढ्ढा यांच्या रेड कार्पेट स्क्रीनिंगवर कलाकारांची हजेरी

Exit mobile version