Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा घेतला समाचार, म्हणाले जे लोक हँग झाले…

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा घेतला समाचार, म्हणाले जे लोक हँग झाले…

कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणीदौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारु पिता का? असा प्रश्न विचारला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. सचिन सावंत यांच्या ट्वीटनंतर अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. तसेच यावरुन अमोल मिटकरी यांनी देखील सत्तार यांच्यावर टीका केली होती.

यासंपूर्ण प्रकरणा नंतर “अमोल हा अनमोल नाही बेमोल आहे, त्याची चर्चा आपण करावी एवढा तो मोठा नाही.” असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. तसेच जे लोक हँग झाले आहेत ते टीका करण्याचं काम करत असल्याचे ते म्हणाले. अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा : 

Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जातात, मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत ; जयंत पाटील

याबाबत सत्तारांनी अधिकचे स्पष्टीकरण देत म्हणाले, आम्ही जेव्हा राज्यात फिरत असतो तेव्हा कुठे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर बसल्यानंतर हसी मजाक करत असतो. आता हसी मजाकमध्ये केलेली गोष्टसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही पोस्ट करुन व्हायरल करायचं काम हँग झालेले लोक करत असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांच्याकडे काहीच काम उरलेले नाही, त्यामुळं त्यांना ते करु द्या, असे प्रत्युत्तर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना दिलं. एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनाही त्यांनी चोख प्रतिउत्तर दिलं. अमोल हे काय अनमोल नाहीत ते बेमोल आहेत. त्यामुळं त्या त्यांची चर्चा करावी एवढे ते मोठे नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हणाले?

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडिओ गुरुवारी समोर आला, ज्यामध्ये ते जिल्हा दंडाधिकारी शर्मा, जिल्हा अधिकारी आणि काही इतरांसह एका सभागृहात बसलेले दिसत आहेत. तिथे सर्वांना चहा देत असताना शर्मा यांनी चहा पिण्यास नकार दिला. तेवढ्यात, सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांना कथितपणे विचारताना ऐकू येतात, “तुम्ही दारू पिता का?” सत्तार यांच्या प्रश्नावर, तिथे उपस्थित असलेले डीएमही गप्प बसू शकत नाहीत, त्यांनी असे उत्तर दिले की, कधी कधी थोडे दारू पितो. अब्दुल सत्तार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

श्री कृष्णांनी गीतेत सांगितलं आहे कि कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ….

Exit mobile version