Abdul Sattar : अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ‘सभा घेण्यास हिम्मत लागते. सभेस परवानगी मिळाली आहे. आता ही सभा घेता येत नसेल तर आमच्या मंचावर यावे, आमचा स्टेज, माईक, पब्लिक वापरून खा. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर काय बोलायचे ते बोलावे’ असे थेट आव्हान कृषिमंत्री सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. तसेच सिल्लोड सोयगाव तालुक्यात पब्लिक माझ्या सोबत आहे. आदित्य ठाकरे यांची सभा झालीच पाहिजे म्हणजे दुधका दूध आणि पाणी का पाणी होईल, त्याचबरोबर सत्तारांनी आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू,दुसरा पप्पू म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तर आता सत्तार यांनी टीका करतांना आदित्य ठाकरे यांचा ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख केला आहे.

हेही वाचा : 

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का; राहत्या घरासह कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेणार

यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की,सिल्लोड येथील सभेला परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांची होत असलेल्या सभेचं ठिकाण सोडून इतर कोणत्याही ठिकाणी सभा घेण्यासाठी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना परवानगी दिली आहे. आमची सभा असलेल्या ठिकाणपासून ते पंधरा फुटावर परवानगी मागत आहे. त्यामुळे त्यांना परवानगी देणं शक्य नाही. त्यामुळे उगाच पोलिसांच्या नावची बदनामी करून रीकामचोट ‘रणछोडदास’ बनू नका असा टोला सत्तार यांनी लगावला आहे.

सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार?

पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना ज्या ठिकाणी सभा घायची आहे त्या ठिकाणी गरज पडल्यास स्टेज उपलब्ध करून देतो. मंडप नसेल तर मंडप देतो, माईक नसेल तर तेही देतो परंतु सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घ्यावी असे सत्तार म्हणाले. तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांना चॅलेंज करतात, मात्र मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारा माणूस त्यांच्या मुलासमोर लढू शकत नसेल तर त्याला रणछोडदास म्हणावे लागले, असेही सत्तार म्हणाले.

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार ?

Exit mobile version