अब्दुल सत्तारांचा पक्षामधल्या नेत्यांवर अविश्वास? केलं मोठं विधान

अब्दुल सत्तारांचा पक्षामधल्या नेत्यांवर अविश्वास? केलं मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, अब्दुल सत्तार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील एका नेत्याकडूनच माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळं शिंदे गटातच अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे.

टीईटी घोटाळा (TET Scam), सिल्लोड येथील कृषीमहोत्सव (Agriculture festival at Sillod) आणि वाशीम (Washim) येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.

यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात. सत्तारांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawle म्हणाले, “पहिल्यांदा त्यांना जे काही मंत्रीपद दिलेलं आहे ते मुख्यमंत्री शिंदेंनी केलेलं आहे. त्याचं काम ते करत आहेत. ते काम करतात म्हणजे छोट्यामोठ्या चुका होत असतात. पण त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. आम्ही मंत्रीपदाच्या रांगेत आहोत पण आम्ही कधी काही बोलतोय का? आमच्यासारखी मंडळी समजून घेऊन चाललेले आहेत”.

हे ही वाचा:

Myanmarच्या नेत्या आंग सान स्यू की यांना ३३ वर्षे राहावे लागणार तुरुंगात, जगभरातून केला जातोय निषेध

Twitter Update जानेवारी २०२३ मध्ये एलोन मस्क देणार मोठी भेट, ट्विटरमध्ये येणार हे खास वैशिष्ट्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version