spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये वाढ

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह अनेक आमदार देखील त्यांच्या सोबत गेले होते. त्यातलेच एक म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतातच.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह अनेक आमदार देखील त्यांच्या सोबत गेले होते. त्यातलेच एक म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तर हे कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत असतातच. मात्र आता त्यांच्या समोर मोठा अडचणी निर्माण झालेल्या बघायला मिळत आहेत. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक योगाला खोटी माहिती दाखवण्यात आणि सांगण्यात आली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी (Abdul Sattar) यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) निवडणूक आयोगाला (Election Commission) संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकच जमीन जी २०१४ रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये २०१९ अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच एकूण ४ ते ५ मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावर असल्याचं न्यायालयाच्या तपासात आढळून आलं आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयानं या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी सिल्लोड (Sillod) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचं मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय ६ वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.

हे ही वाचा:

‘Facebook Game’चा अनोखा खेळ रंगणार? मर्डर मिस्ट्री मागचं गुपित उलगडणार २३ ऑगस्टला

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss