संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन, एक्स्प्रेस वेवर कंटेनरला धडक

संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन, एक्स्प्रेस वेवर कंटेनरला धडक

शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे अपघाती निधन झाले. माजी सरपंच अंबादास नरवडे यांचा मुंबईहून औरंगाबादला येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात नरवडेंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती प्राप्त होताच मंत्री भुमरे यांनी नाईट ड्रेसवरच रुग्णालयात धाव घेतली. नरवडे हे भुमरे यांच्या विश्वासातील खास समर्थक होते. ते भुमरेंचे मावस बंधू असल्याची माहिती आहे.

मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अंबादास नरवडे आणि इतर तीन कार्यकर्ते हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम आटोपून मंगळवारी रात्री ते त्यांच्या कारने कार्यकर्त्यांसह औरंगाबदकडे निघाले होते. दरम्यान मुंबई – पुणे महामार्गांवर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. कंटेनरला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर कारमधील चारही जखमींना तातडीने तळेगाव येथे हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून नरवडे यांना मृत घोषित केले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नरवडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे पहाटे चारला घटनास्थळी दाखल झाले. रात्री त्यांनी रुग्णालयातच काढली. नरवडे हे माजी सरपंच होते. ते भुमरे यांचे तालुक्यातील खंदे समर्थक मानले जायचे.

हे ही वाचा :

नेताजींच्या ‘नंतरच्या आयुष्यावर’ काढण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या विरोधात नेताजी कुटुंबाने दाखल केली जनहित याचिका

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version