Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

काही दिसांपूर्वी शरद पवार यांना सोशलमीडिया मार्फत जीवे मारण्याची धमकी आली होती. या गोष्टीमुळे पवारांचे असंख्य चाहते तसेच कार्यकर्त्ये आक्रमक झाले होते.

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

शरद पवार हे नाव महाराष्ट्रातील राजकारणातील अतिशय मोठे नाव आहे. शरद पवार यांचा लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. सध्याच्या घडीला शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यतं जुने व मुरलेले नेते आहेत. पवार यांच्या एका शब्दावर संपूर्ण राजकारण फिरते. नुकतेच राष्ट्रवादीच्या २५व्या वर्धापनदिनानिमित्त पवारांनी मोठी घोषणा केली. व सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केले.

काही दिसांपूर्वी शरद पवार यांना सोशलमीडिया मार्फत जीवे मारण्याची धमकी आली होती. या गोष्टीमुळे पवारांचे असंख्य चाहते तसेच कार्यकर्त्ये आक्रमक झाले होते. या धमकी मुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. अनेक बड्या राजकीय नेत्यांनी पवारांना धमकी देणाऱ्याला लवकरात लवकर पकडण्याचे आदेश पोलिसांना दिले. रविवारी या आरोपीला पकडण्यात मुंबई गुन्हे शाखेला (Mumbai Crime Branch) यश आले.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक ग्रुप वर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे अकाउंट आहे. या अकाऊंटवरून शरद पवार यांना उद्धेशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आला होता. याच संबंधित मुंबई गुन्हे शाखेने रविवारी एका इसमाला पुण्यातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय ३४) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर असून याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

अमित शहा यांचं तामिळनाडूत मोठे वक्तव्य

Cyclone Biparjoy:हवामान खात्याकडून भारताच्या किनारपट्टीला बिपरजॉयचा धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version