spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धीविण्याक मंदिराबाबत आदेश बांदेकर यांची पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांपासून आदेश बांदेकर (Adesh Bandekar) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (Maharashtra Navnirman Sena) चांगलीच झुम्पली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्या वर गंभीर आरोप केले होते. त्यावर आदेश बांदेकर यांनी मौन (silence) बाळगल्याच दिसून आलं. पण आज आदेश बांदेकर यांनी ट्विट करून यशवंत किल्लेदार यांच्यावर टीका केलीय आहे. यशवंत किल्लेदार हे आपल्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याचं आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे.

 आदेश बांदेकर यांनी ट्विट करत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना टोला लगावला आहे. आदेश बांदेकर यांनी याबाबत सलग दोन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ माझ्यावर आणि श्री सिद्धिविनायकांवर तथ्यहिन आरोप करून जगप्रसिद्ध हिंदू देवस्थानाची बदनामी करण्याचे षडयंत्र (Conspiracy) रचत सवंग प्रसिद्धिसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी खरंच सुबुद्धि द्यावी हिच प्रार्थना.अजूनही मी मर्यादा पाळत आहे’ असं म्हणत बांदेकर यांनी एक प्रकारे मनसेला इशाराच दिला आहे.

यशवंत किल्लेदार यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन आदेश बांदेकर यांच्या गंभीर आरोप केले होते. तर कधी त्यांच्याकडून आक्रमक भूमिका सुद्धा घेताना दिसून आले. तर आदेश बांदेकर यांनी आणखी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबाबत (Siddhivinayak Ganapati Temple) पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये.आजच दादर पोलिस स्टेशन आणि सिद्धिविनायक सीसीटीव्ही (CCTV) टिमच्या सहाय्याने एका माऊलीचे टॅक्सीत राहिलेले काही लाख रूपये परत मिळवून देण्यात यश मिळाल्याबद्दल दादर पोलीस स्टेशन (Dadar Police Station) कडून टिमला धन्यवाद देण्यात आले’.

हे ही वाचा:

शिवाजी पार्कवरील जन आक्रोश मोर्चात, भाजप नेत्यांचे शक्ति प्रदर्शन

भाजप आणि शिंदेगटाच्या नेत्यांचा जन आक्रोश, महामोर्च्यसाठी पहिल्यांदाच येणार एकत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss