सेनेच्या व्हीपच उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार :आदित्य ठाकरे

सेनेच्या व्हीपच उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार :आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. सभेला हजर राहण्यासाठी अदित्य ठाकरेंना थोडा विलंब झाला होता. त्या नंतर बहुमत चाचणीला सुरूवात होऊन भाजप- शिंदे गटने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

विधानभवना बाहेर अदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताणा बंडखोर आमदारांवर टिका केली. ते म्हणाले, जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती. पण शिवसेना कधी संपणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. ज्यांनी बंडखोरी केली ते आमदार कधी सूरत, कधी गुवाहाटी तर कधी गोव्याला राहिले, पण जेव्हा ते आपल्या मतदारसंघात जातील आणि आपल्या मतदारांना भेटतील तेव्हा काय होईल हे आम्ही पाहतोय.

हेही वाचा : 

Breaking | आदित्य ठाकरे व बंडखोर आमदार आमने सामने

कुर्ल्यात जेव्हा इमारत कोसळली होती तेव्हा आम्ही गेलो होतो, तिथले आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, त्यामुळे हे आमदार जेव्हा आपल्या मतदारसंघात जातील तेव्हा त्यांना कळेल मतदारांचं मन कोणाच्या बाजूने आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्यांनी पक्ष पोखरून काढण्याचा प्रयत्न केला, लोकं सोबत नेण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षात गेलेत त्यांना शुभेच्छा देत सावध राहण्याचा सल्ला देतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, प्रचंड ताकदीने शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकावेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा भाजपाचा कट होता : भास्कर जाधव

Exit mobile version