वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक, आंदोलनाची केली घोषणा

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक, आंदोलनाची केली घोषणा

राज्यात वेदांत फॉक्सकॉन प्रकणावरून युवासेना पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्टात होणार वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेह्ण्यात आला, त्यानंतर महाराष्ट्रमध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. प्रकल्प जागृत मध्ये घेऊन गेल्या मुले महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. यामुळं शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. यासाठी त्यांनी ‘जनआक्रोश’ आंदोलनाची घोषणा केली.

पुण्यात २४ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरेंचं हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंनी या निषेध आंदोलनाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. आदित्य ठाकरे पुण्यात आंदोलन करणार आहेत, कारण पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथं हा प्रकल्प येणार होता. पण आता हा प्रकल्प इथून गुजरातमध्ये गेल्यानं मोठ्या प्रमाणावर पुण्यातील तरुणांचा रोजगार गेला आहे.

महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प व्हावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने पूर्ण प्रयत्न केले होते. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांनी लवकरच हा प्रकल्प तळेगाव येथे सुरू होणार होता. पुणे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणच्या मोटार उत्पादक कंपन्यांमध्ये सेमीकंडक्टरची मायक्रोचीप व डिजिटल उत्पादनामध्ये लागणाऱ्या चीपचा अनेक दिवसापासून तुटवडा असल्याने मोटार खरेदी व विविध वस्तू खरेदीसाठी त्यांना तीन महिने, सहा महिने, वर्षभर प्रतीक्षेत राहावे लागत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पुण्यामध्ये हा प्रकल्प अत्यंत गरजेचा होता. तळेगाव येथे हा प्रकल्प आला असता तर १ लाख २० हजार पेक्षा अधिक कामगार-कर्मचारी कष्टकरी कामगार यांचा नोकरी उपलब्ध होऊन फार मोठा फायदा झाला असता.

काही दिवसांपूर्वी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सवाक्षरी मोहीम रावबावनयत आली. आता पुन्हा युवासेनेच्या वतीने जण आक्रोश आंदोलन करून राज्य सरकारचा निषेद व्यक्त करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू

काँग्रेसला १९ ऑक्टोबरला मिळणार नवा अध्यक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version