आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला विरोधकांवर हल्लाबोल

ठाण्यात महाविकास आघाडीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रचंड गर्दी झालेली बघायला मिळाली. शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला ठाणेकरांनीदेखील उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे . ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची (thackeray group) महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला विरोधकांवर हल्लाबोल

ठाण्यात महाविकास आघाडीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रचंड गर्दी झालेली बघायला मिळाली. शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला ठाणेकरांनीदेखील उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे . ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची (thackeray group) महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. सदर घटनेचा व्हिडिओ ही समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तक्रार करत आहेत. याउलट रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात जनआक्रोश भव्य मोर्चा काढला आहे.या मोर्चाला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. या मोर्चात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे यांच्यासह काँग्रेसचे देखील सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात प्रचंड गर्दी बघायला मिळतेय.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाषणाला सुरवात केली. रोशनी शिंदे यांच्या मारहाणी प्रकरणाला हात घालून त्यांनी महिलांविषयी आदरार्थी मत मांडले की , एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते. तसेच जितेंद्र आव्हाडांनी रोशनीच्या facbook च्या सर्व बघितल्यावर त्यामध्ये कोठेही अश्लील पोस्ट किंवा असंस्कृत वाक्य दिसून येत नाही असा खुलासा त्यांनी यावेळी केला. त्यांच्या पोस्ट या शिवसेनेच्या संस्कारातल्या आहेत.असे हि, ते यावेळी म्हणाले. हे जे शिंदे सरकार स्थापन झालेले आहे त्यांच्या संस्काराची नोंद अख्या देशाने घेतली आहे असे हि मत त्यांनाही यावेळी मांडले. मुख्यमंत्र्यांच्या गावात राहून मी त्यांच्यासोबत राजकारणात खांद्याला खांदा लावून इतकी वर्ष लढलो. परंतु या घटनेची शहानिशा करण्यासाठी तुम्हाला याबद्दल मी विचारणा केली असता तुम्ही आमचे फोन नाही का उचलू शकलात? यासारखी दुसरी ही खेदनीय बाब नाही. लोक तुमच्याकडे झुकावी म्हणू तुम्ही कोणत्याही ठरला जाऊ शकता,दादागिरी करू शकता असे तुम्हाला जर वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे असे सरकार चालतं नाही असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी जनक्रोष भाषण दरम्यान केले. त्याचबरोबर भाषणाच्या समाप्तीला त्यांनी आपले झेंडे जरी वेगवेगळे असले तरी आपले नाते हे रक्ताचे आहे. आपल्याला हि लढाई लढाईची नाही तर जिंकायची आहे.असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ठाण्यात महाविकास आघाडीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तसेच या मोर्चाचे नाव देखील जनप्रक्षोभ मोर्चा म्हणून ठेवले गेले. कारण सध्या स्थितीला लोकांच्या मनातील जो राग आणि सरकार बद्दल जो राग आहे तो जनसमुदायामधून दिसत आहे. म्हणूनच या मोर्चाची बांधणी ही जनतेला समोर ठेवून केली आहे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच सभेच्या सुरवातीलाच आदित्य ठाकरे यांनी कमिशनर ऑफिस साठी मोठे टाळे मी सोबत घेऊन आलो आहे. आत्ताच पक्ष हा चोरांचा आहे आणि चोरांचा पक्ष कधी असू शकत नाही. असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर केला आहे. ठाण्यातले पोलीस कमिश्नर हे कायम वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्रायच्या आज्ञेनुसार मोजमाप करत बसलेले असतात. असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर जमलेल्या जमावासमोर आपले सरकार आल्यानंतर तुमच्या सहभागाने आपण जेलभरी आंदोलन करणार आणि सध्याच्या सरकारमधल्या भ्रष्टाचारी लोकांना आणि गद्दारांना जेल मध्ये भरणार अशी हमी यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्मुतीस्थळावर जाऊन घेतली आहे. असे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आज स्वतः आलो आहे. अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आपल्या सुसंकसृत ठाण्याला बदनाम केलं जात आहे.माविआच्या नेत्यांना येणाऱ्या धमक्यांना , आणि नेत्यांना शिवीगाळ होते तरी कोणताही FIRची नोंद केली नाही. आपली सत्ता असताना एवढा गलीच्छ राजकारण बघितला नाही. गद्दारांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव बदनाम होत आहे.असेही आदित्य ठाकरे म्हणाले. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रासाठी काम करत नाही. म्हणून या सरकारला चाले जाव सांगण्याची वेळ आली आहे. तसेच कंटाळलेल्या ठाणेकरांना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की , माझी ठाण्यात येऊन निवडणूक लढण्याची तयारी आहे, मी एकटा येईन,मला तुम्ही निवडून द्या मी माझ्या वचनांशी नेहमी बांधील राहीन असे आदित्य ठाकरे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे यांना खुले आव्हाहन केले. तर जाता जाता आदित्य ठाकरे यांनी सर्वच पक्षांना विनंती केली प्रत्येक राज्यातून नरी शक्ती मोर्च काढला गेला पाहिजे.

हे ही वाचा : 

भाजपला पोहचायचंय राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात. Maha #BJP would like to make space in 3 cr. Family

नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यवार बरसले

उन्हाळ्यामध्ये माठातले पाणी पिणे फायदेशीर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version