spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हे सरकार घाबरट सरकार आहे, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही, आदित्य ठाकरे

Maharashtra Assembly Winter Session आजपासून (१९ डिसेंबर २०२२ ) राज्याचं हिवाळी अधिवेशनाला नागपूरात (Maharashtra Assembly Winter Session) सुरुवात झाली आहे. करोना संकटनानंतर हे पहिल्यांदाचा नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीमाप्रश्न, ओलादुष्काळ, राज्यातील प्रकल्प यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर घणाघात टीका केली आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे हिवाळी अधिवेशनासाठी आले असता नागपूर (Nagpur) विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “सीमाप्रश्नावर कर्नाटकातून आक्रमक भूमिका घेतली जात असून, आपलं घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेलेत, त्यावरही उत्तर देण्यात आलं नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) आव्हान दिलं, माझ्याशी माध्यमांसमोर येऊन चर्चा करावी. पण, अद्यापही ते झालं नाही,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : 

Share Market Opening Bell दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्सने ओलांडला ६१ ००० अंकांचा टप्पा

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, हे ना बेकायदेशीर सरकार आता घाबरट सरकारही झालं आहे, महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. पहिला मुद्दा सीमाभागावर सरकारकडून काही बोललं जात नाही. कर्नाटक या मुद्द्यावर (Maharashtra karnataka border) आक्रमक आहे. पण आपलं घटनाबाह्य सरकार काहीच बोलत नाही, या मुद्द्यावरून आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. दुसरा मुद्दा हा महाराष्ट्रातील प्रकल्पांचा आहे. महाराष्ट्रातून पळवून नेण्यात आले आहेत. त्यावर उत्तर आलं नाही. या मुद्द्यावर मीडियामध्ये येऊन माझ्याशी चर्चा करावी, असं चॅलेंजच मी महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारला केलं होतं. पण त्याला त्यांचा प्रतिसाद दिला नाही, असं ते म्हणाले.

FIFA World Cup Final 2022 अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस!, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट

“दोन-तीन महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना कोणताही मदत झाली नाही,” असे सांगत कर्नाटक प्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार घाबरट आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर आपले दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही. हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss