आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज, वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज, वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. त्यानंतर माहाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेने मध्ये दोन गट पडले एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट (Thackeray Group). दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तर अनेकदा दोन्ही गटांकडून एकमेकांना खुली आव्हानंही देण्यात आली आहे. तर आता नुकतच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आदित्य ठाकरें यांनी सांगितलं की “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा”, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना दिल आहे.

जेव्हापासून शिवसेनेमध्ये बंड झाला आहे. तेव्हापासून शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिवसेना शिंदे गट या दोन्हीही गटांमध्ये शाब्दिक युद्ध हे सुरूच आहे. तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान दिलं आहे. अलीकडेच आदित्य ठाकरे हे चेंबूरमधील कार्यक्रमात गेले होते त्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आव्हान दिल आहे. यावेळेस आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी,” असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले. त्याच बरोबर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की ” जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही”, असे म्हणत आथित्या ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की “महाराष्ट्राचे १३ खासदार आणि ४० आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.”असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह शिवसेना शिन्देगतालाच आव्हान दिले आहे.

हे ही वाचा : 

EXCLUSIVE,कोकणातून लोकसभेत कोण जाणार? राऊत,राणे,जठार की सामंत…

सामनातून शिवसेनेचा भाजपला टोला, विधान परिषद निवडणुकीचे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version