महापालिका निवडणूक करण्याची हिंमत दाखवावी, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

हापालिका निवणूक करण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हान देखील दिलं आहे. त्याचबरोबर बाकीच्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विचार करतात, मात्र आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, अशी टीका देखील यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

महापालिका निवडणूक करण्याची हिंमत दाखवावी, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यापासून शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेते नेहमीच एकेमकांवर टीका करताना दिसतात. आज देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांच्या मतदार संघात शैक्षणिक कार्यक्रमाच्या उदघाट्नच्या आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. महापालिका निवणूक करण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हान देखील दिलं आहे. त्याचबरोबर बाकीच्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विचार करतात, मात्र आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, अशी टीका देखील यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

ऋतुजा लटके यांच्या अंधेरी मतदार संघात आज शैक्षणिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाची वेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,”नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने झाली आहे. सिनेट ठीक आहे, पण आम्ही म्हणतो विधानसभेच्या, महापालिकेच्या निवडणूक घ्या, त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही म्हणून हे सर्व सुरु आहे. ४० गद्दार आमदार, १३ खासदार आणि महापालिका निवडणूक घेऊन दाखवा”, असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी दिल आहे.

त्यानंतर आदित्य ठाकरेंनी अनेक विषयांवर अभ्यास सुरु असल्याचे देखील स्पष्ट केलं. या वेळी बोलताना ते म्हणाले,”गेल्या वर्षी १७०० कोटींची काम होती. ती जीबीने पास केली होती. स्टँडिंग कमिटीने पास केलेली काम आयुक्त बदलू शकतात का? मग आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. यावर अभ्यास सुरु असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी पुढे असंही म्हटलं,”खरोखर ७ हजार कोटींची काम होऊ शकतात. जर होऊ शकत असतील तर मग कल्याण नागपूरला रस्ते का नाही झाले?असा सवाल केला आहे. त्यावर त्यांचा अभ्यास सुरु असल्याचे आदित्य ठाकरेंनी संगितलं.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त स्वःताच विचार करतात, अशी खोचक टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले मुख्यमंत्री मात्र, दिल्लीला जाऊन बसतात. इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विचार करतात. आपले मुखयमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात.” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

त्याचबरोबर आज आदित्य ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये काय निर्णय होतात हे पाहून महत्वाचं असणार आहे.

हे ही वाचा:

विमानात महिलेवर लघवी करणाऱ्याला पोलिसांनी पकडण्याआधीच आरोपी फरार

NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, NEET PG साठी अर्जाची प्रक्रिया ढकलण्यात आली पुढे

राज ठाकरेंनी दिला जैन समाजाच्या मागणीला पाठिंबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version