“नशीब ह्यापकिंग यांना खेकडा वाटलं नाही” म्हणत आदित्य ठाकरेंनी केली तानाजी सावंतांवर टीका

त्यांना हाफकिन पण दलाल वाटला का?

“नशीब ह्यापकिंग यांना खेकडा वाटलं नाही” म्हणत आदित्य ठाकरेंनी केली तानाजी सावंतांवर टीका

हाफकिन(haffkine) नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करा असा आरोग्यमंत्र्यांनी दिलेला आदेश थेट पेपरात छापून आल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Health Minister Tanaji Sawant ) यांचा ससून रुग्णालयातील दौरा चांगलाच व्हायरल झाला आहे. याच गोष्टीला धरून आदित्य ठाकरेंनी आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.तानाजी सावंत यांच्या अज्ञानावर टीका करत असताना “नशीब ह्यापकिंग यांना खेकडा वाटलं नाही” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray ) त्यांची खिल्ली उडवली आहे.

आरोग्यमंत्री हाफकिन संस्थेचा उल्लेख हाफकिन नावाचा माणूस असं करतात. त्यांना हाफकिन पण दलाल वाटला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. हाफकिन संस्था शासनाची संस्था आहे हे देखील त्यांना माहिती नव्हतं. ती खूप मोठी संस्था आहे हे त्यांना माहिती नाही का? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तानाजी सावंत यांच्यावर हल्ला चढवला. तर दुसरीकडे मी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे मला हाफकीन बद्दल कसं माहिती नसेल अशी सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

तसेच शिवसेनेच्या चिन्हाबद्दल बोलत असताना, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केल्यामुळे शिंदे गटाकडून घाणेरडं राजकारण सुरु असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. शिवसेना फोडण्याची अशी हिंमत वृत्ती कधी कोणी केली दाखवली नव्हती ही वृत्ती आता लोकांसमोर येत आहे. आमच्या सोबत उभे राहिलेले शिवसैनिक हेच आमचा सगळ्यात मोठा वारसा आहे.लोकांना ही गद्दारी पटलेली नाही. यामुळे ज्यांना तिकडे जायचं असेल स्वतःचं राजकीय कॅरियर डुबवायचं असेल मी आता त्यांना काही सांगू शकत नाही असे आदित्य म्हणाले.

हे ही वाचा:

T20I खेळाडूंच्या क्रमवारीत बाबरला मागे टाकत रिझवान बनला नवा बादशाह

खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version