spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आजोबांची जयंती आदित्य ठाकरे विसरले, केली मोठी चूक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त राज्य सरकार आणि शिंदे गटाच्या वतीने त्यांच्या चित्राचे महाराष्ट्र विधिमंडळात अनावरण करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नातू निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक मोठी चूक केली आहे. काल त्यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर वरून एक ट्विट केलं आणि त्यांना नेटकाऱ्यानी चांगलंच घेरलं आहे.

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आदित्य ठाकरे यांनी काल एक ट्विट केले होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा “स्मृतिदिन” असा उल्लेख केला आहे. त्यावरून ते चांगलेच चर्चेत आले आहे. ट्विट पाहता नेटकऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचाच विसर पडला की काय…? असा सवाल उपस्थित केला आहे.

काही क्षणात चुक लक्षात येताच आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केले. आणि दुसरं ट्विट करण्यात आलं आहे. ‘उद्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त समीर देसाई फाऊंडेशन गोरेगाव (Goregaon) आयोजित बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. प्रत्येकाच्या मनात बाळासाहेबांचं एक वेगळं छायाचित्र टिपलं गेलं आहे. ते जाणता यायला हवं. साहेब नेहमी आपल्यासोबत आहेत!’, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

हे ही वाचा:

का साजरा करावा प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य

26 JANUARY कसा साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss