आदित्य ठाकरेंनी तेजस्वी यांना मुंबईला येण्याचं दिलं आमंत्रण

आदित्य ठाकरेंनी तेजस्वी यांना मुंबईला येण्याचं दिलं आमंत्रण

उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे आज २३ नोव्हेंबर रोजी बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी थेट बिहरला जाऊन या नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी. भेटीचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ही भेट राजकीय नव्हती, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्यासोबत आधीपासून चर्चा सुरू होती. कोरोनाच्या काळात भेट होऊ शकली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या सरकारचे काम चांगलं सुरू आहे. बिहारमध्ये विकास दिसून येतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील जो युवक देशासाठी काम करू इच्छितो, रोजगार निर्माण करू इच्छितो, महागाईविरुद्ध काम करू इच्छितो हे सगळे एकत्र आले तर देशात काही तरी चांगल करता येईल, असं आदित्य यांनी म्हटलं.

युवक नेत्याचं नेतृत्व कोण करणार, यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, दरवेळी राजकारण करणं गरजेचं नाही. तेजस्वी यादव चांगलं काम करत आहे. आम्ही लंबे रेसचे घोडे आहोत, असंही आदित्य यांनी नमूद केलं. तर आमचं पहिलं उद्दीष्ट लोकशाही वाचविण्याचं असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.आदित्य ठाकरे यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दले आहे. याबाबत बोलताना “जेव्हा वेळ असेल तेव्हा मुंबईत या, असे आमंत्रण मी त्यांना दिले आहे. हे येणे-जाणे सुरुच राहणार आहे. त्यांनी मला येथील पर्यटणस्थळं पाहण्यासाठी बोलावले आहे. तर मीदेखील त्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रत्येकवेळी राजकारण करणे गरजेचे नाही. तेजस्वी यादव चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात देशातील प्रत्येकजण सौहार्दाने राहतो. मागील अडीच वर्षात आम्ही संविधानानुसार राज्यकारभार हाकत होतो. विकासावर आम्ही काम करत होतो,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये… ; अजित पवार

प्रकाश आंबेडकरांशी चर्चेला तयार; अजित पवार

वेळीच कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता ; श्रद्धाने लिहिलेलं पत्रावर फडणवीसांनी केलं भाष्य

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version