जालन्यातील प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी केले वक्तव्य म्हणाले…

शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अशाप्रकारे लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजुने एकमेंकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

जालन्यातील प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी केले वक्तव्य म्हणाले…

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यामध्ये काही महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अशाप्रकारे लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजुने एकमेंकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

जालन्यात आंदोलकांवर भयानक लाठीमार झाला. हे सरकार जनरल डायरचं आहे की महाराष्ट्राचं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला. तसेच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना न कळवता पोलीस अशाप्रकारे लाठीमार करतील, हे अशक्य आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “जालन्यात जी घटना घडली, ती आपण सर्वांनी पाहिली आहे. हा भयानक लाठीमार होता. एखाद्या शत्रूवर हल्ला करावा, अशाप्रकारे लाठीमार करायला लावला आहे. मी दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. एवढं संवेदनशील आंदोलन होत असताना, मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीमार करतील, हे अशक्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना १०० टक्के हे माहीत असणार. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. लाज असेल तर राजीनामा देतील.

बारसू येथे असंच आंदोलन झालं होतं. तिथेही महिलांवर लाठीमार आणि अत्याचार झाला. खारघरमध्ये जे प्रकरण घडलं, त्याचीही चौकशी झाली नाही. वारकऱ्यांवरही असाच लाठीमार झाला. आता मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीमार झाला. तरीही सरकार लाज नसल्यासारखं वागत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व लोक शांततेत आंदोलन करत असताना एवढा लाठीमार करण्याची गरज नव्हती. हे सरकार नक्की कुणाचं आहे? हे सरकार जनरल डायरचं आहे की महाराष्ट्राचं? असा प्रश्न पडतो”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी केल्या या ५ घोषणा

आदित्य L १ मध्ये महिला शास्त्रद्यांचा सहभाग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version