Thursday, July 4, 2024

Latest Posts

आधी ‘वडिल’ आता ‘मुलगा’; Aditya thackeray यांची Devendra fadanvis यांच्यासोबत भेट

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची एकाच विधिमंडळ परिसरात भेट झाली होती आणि एकाच लिफ्टने प्रवास देखील त्यांनी केला होता. मात्र आज विशेष घडलं ते म्हणजे विधानभवनाच्या दालनात आदित्य ठाकरे(Aditya thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट.वडिलांनंतर मुलाची देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी भेट झाल्याने अनेक चर्चा आता सुरु झाल्या. 

राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session 2024)पहिल्याच दिवशी दोन महत्त्वाच्या अशा घटना घडल्या. एक म्हणजे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या दालनात जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची एकाच विधिमंडळ परिसरात भेट झाली होती आणि एकाच लिफ्टने प्रवास देखील त्यांनी केला होता. मात्र आज विशेष घडलं ते म्हणजे विधानभवनाच्या दालनात आदित्य ठाकरे(Aditya thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट.वडिलांनंतर मुलाची देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी भेट झाल्याने अनेक चर्चा आता सुरु झाल्या. 

 गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहे. काल पर्यंत एकमेकांचे कट्टर वैरी होते तेच आज एकमेकांसोबत थोडीफार जवळीक साधायचा प्रयत्न करत आहेत.एकेकाळी युतीत असलेले आता विरोधात असल्याने एकमेकांची उणीधुणी, दावे – प्रतिदावे करत आहेत. पण काही दिवसांपासून ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पुसटता का होईना संवाद साधत असताना दिसत आहे. पहिल्या दिवशी भेट झालेला तो व्हिडिओ व्हायरल होताच भाजप आणि सेनेची युती पुन्हा एकदा होणार का अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्या चर्चांवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बाजू स्पष्ट केली होती.

आज विधानभवनाच्या लॉबीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) आणि ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) चिरंजीव आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांची भेट झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीची दोर पकडत आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांची भेट झाली.त्यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)यांनी विचारलं की, नमस्कार, काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी मिश्किपणे “मी लिफ्ट मधून चाललोय”असं म्हणत हसतखेळत संवाद केला. या दोघांच्या संवादानंतर सर्वांमध्ये हशा पेटला. दरम्यान, अचानक झालेल्या या भेटीनंतर आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तर त्याचबरोबर त्यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे देखील उपस्थित होते.  

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss