औरंगाबाद दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, आजपासून मला छोटा पप्पू म्हणा…

औरंगाबाद दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, आजपासून मला छोटा पप्पू म्हणा…

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटात सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान अशात गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे. तर सत्तार यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधील आक्रोश मोर्च्यातून उत्तर दिले आहे. मला छोटा पप्पू म्हंटल्याने जर राज्यातील प्रश्न सुटत असतील तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात दोन-तीन महिने अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसानंही झोडपून काढलं. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. पण कृषीमंत्री कुठे आहेत? ते कधी बांधावर गेले आहेत का? त्यांना शेतकऱ्यांशी बोलताना पाहिलंय का? मुळात कृषीमंत्री कोण आहेत? त्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे का? गद्दार कृषीमंत्र्यांचं नाव काय आहे? मुख्यमंत्र्याचं नाव गद्दार आहे, कृषीमंत्र्यांचं नावही गद्दार आहे. मुळात चाळीसच्या चाळीस आमदार गद्दारी करून फिरत आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांसह शिंदे गटावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : 

गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली; अंबादास दानवे यांची शिंदे गटावर खोचक टीका

छोट्या पप्पूला अजून कळतच नाही की कुणाला काय विचारावं. त्यांची अनेक जुनी प्रकरणं काढली तर त्यांना फिरता येणार नाही.’ असे कृषीमंत्री सत्तार यांनी म्हटले होते. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा उल्लेख अब्दुल सत्तार छोटा पप्पू म्हणून उल्लेख करत आहे. त्यामुळे मला नक्कीच छोटा पप्पू म्हणा,माझा उल्लेख छोटा पप्पू म्हणून करा, पण यातून राज्यातील प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर माझं नाव छोटा पप्पू ठेऊन राज्यातील शेतकरी खुश होणार असतील, माझं नाव छोटा पप्पू ठेवल्याने राज्यात उद्योग येणार असतील तर चला आजपासून छोटा पप्पू ठेवा मी स्वीकारले, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.

अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा

“कोण गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो पण कारवाई होत नाही. दुसरा एक गद्दार महिलांना शिवीगाळ करतो, पण कारवाई होत नाही. अशा लोकांना पद पदमुक्त करून मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. पण कुठेही कारवाई होत नाही. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र मागे चालला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंची नेत्यांना सूचना; ‘या’ चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये

Exit mobile version