मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे ; आदित्य ठाकरेंचा टोला

मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे ; आदित्य ठाकरेंचा टोला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची सभादेखील होणार असून, ठाकरेंच्या भाषणावेळीच मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लाईव्ह येत महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ज्या प्रकल्पाची पाहणी ते दर महिन्यांना करायचे त्याची पाहणी मुखमंत्री शिंदे जनेतच लक्ष केंद्रित करण्यासाठी करतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्याच बरोबर मुख्यमंत्री यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की, “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणासंदर्भात अद्यापही सरकारकडून कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकी दिली जाते. अजूनही वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून दुसऱ्या जिल्ह्यात का गेलं? याबाबत अद्यापही राज्यसरकारकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेलं नाही.”

‘… आरोप खोटे ठरल्यास काय कराल, पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

पुढे बोलताना आदित्य ठाकरेंनी बल्क ड्रग पार्क प्रकल्पासंदर्भातही माहिती दिली. ते म्हणाले की, “बल्क ड्रग पार्क   प्रकल्पासाठी महाविकास आघाडी मंत्रिमंडळानंही रोहाजवळ रायगड जिल्ह्यात जागा दिली होती. त्यासाठी अडिच हजार कोटींची जागाही दिली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळी आपण केंद्राकडे अर्ज केलं, त्यावेळी आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरातला मिळालं. पण महाराष्ट्रात हा प्रकल्प आला नाही. या प्रकल्पामुळेही जवळपास ७० ते ८० हजार तरुणांना नोकऱ्या मिळू शकल्या असत्या. आपल्याकडे ३९४ फार्मसी कॉलेज आहेत. तसेच, आपण वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये सर्वात पुढे आहोत. ज्या काही क्वॉलिफाईंग ड्रग कंपन्या असतात, त्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. हे दोन्ही प्रकल्प हातातून गेल्यानंतर आता एअर बस प्रकल्पाबाबतही अनिश्चितता आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “वांद्रे- अंधेरी सी लिंकच्या कामासंबंधित मुलाखतीची ही जाहिरात ऑनलाइन आली आहे. मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी अपेक्षा आहे. उद्योग मंत्र्यांना त्यांच्या खात्यात काय सुरू आहे याबद्दल काहीच माहीत नसतं. मुख्यमंत्री यांची या सगळ्यावर भूमिका महत्त्वाची आहे. यातून दोन गोष्टी समोर येतायंत. मुख्यमंत्री यांच्या समंतीने हे सर्वकाही सुरू आहे. नाहीतर त्यांना या गोष्टी माहीतच नाही. पक्षप्रवेश केले जातायत, मग उद्योगांचे प्रवेश राज्यात कधी होणार? एमएसआरडीसीच्या खात्यात मुंबई , महाराष्ट्रत संधी का नाही?”

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचे कौतुक, म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”

हेही वाचा : 

Raju Srivastava : विनोदाचा बादशहा हरपला, राजू श्रीवास्तवबद्दल काही खास किस्से…

Exit mobile version