spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aditya Thackeray : ‘खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही’, पुन्हा एकदा महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे संतप्त

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे गेले कालपासून दौऱ्यावर आहेत. यंदा संपूर्ण राज्यभर पावसाने सरासरी ओलांडली आहे. उद्धव ठाकरें नंतर आता आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत आहेत. आता सध्या आदित्य ठाकरे पुण्यात आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा सत्ताधारांवर निशाणा साधला. वेदांत नंतर टाटा एअरबस प्रकल्प तिकडे गेला. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी अपयश का येतय? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याच बरोबर “या खोके सरकारवर नाही जनतेचा, नाही माझा व उद्योजकांचा विश्वास आहे.’ असा आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Tata Air Bus Project: ३ महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्या प्रकरणी, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडोफोडी हेच करत आहेत. हे सोडून मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात गेले नाही. शिवराज सिंह चौहान आपल्या राज्यात आले. नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. त्यांनी इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसंच मला गेल्या तीन महिन्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन एखाद्या उद्योजकांशी चर्चा केल्याचं एक उदाहरण दाखवा. त्यांनी काहीच केलं नाही.’, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंची फडणवीसांना साद?, कटुता संपवण्याच्या वाटेवर

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यावर आदित्य यांनी टीका केली आहे. मी त्यांच्याबरोबर बसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारलं ते कदाचित करत नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. काल खाती वाटप झालं. उद्योगमंत्र्याने शेतीबद्दल ट्विट केलं आहे. कृष मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातला आहे. कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं? अशी शेरेबाजी त्यांनी केली.

Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंची फडणवीसांना साद?, कटुता संपवण्याच्या वाटेवर

Latest Posts

Don't Miss