आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला

राजकारणात रोज नवीन हालचाली घडताना बघायला मिळत आहे. राष्ट्र्रवादीचे अजित पवार यांनी बंड पुकारून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला

राजकारणात रोज नवीन हालचाली घडताना बघायला मिळत आहे. राष्ट्र्रवादीचे अजित पवार यांनी बंड पुकारून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान या मंत्रिमंडळाचा विस्तारात शिंदे गटातील आमदारांना संधी देण्यात आली नाही. यावरून उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, स्वार्थी विरुद्ध प्रामाणीक असं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. राजकारण गलिच्छ होत चाललं आहे. ही सर्कस कधी थांबणार असा प्रश्न सर्वांना पडतोय. आज विधीमंडळासाठी सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचा निर्णय झाला असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सत्ताधारी हे पक्ष फोडण्यात आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यात व्यस्त झाले आहेत. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असताना, ९ वॉर्ड ऑफिसर्स नाहीयेत, ९ असिस्टंट कमिशनर नेमलेले नाहीयेत असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. क्रिमीनल मेटॅलिटीने सरकार काम करत आहे आणि त्याविरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी सांगितले, गद्दारांना आता समजेल कि, गेल्या वर्षभरात कोणतेही पद देऊ केले नाही. मग या गद्दारांना तिकडे जाऊन मिळाले तरी काय? मला हसू यावर येतंय की, एक वर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी केली त्यांना आज काय किंमत दिलीय भाजपनं ते पाहिलं. आम्ही मंत्री, कॅबिनेट मंत्री बनू या आशेने सोडून गेले. मागच्या शपथविधीला चार दिवस झाले त्यांना कुठलही कॅबेनेटचा पोर्टफोलिओ कुठचा ते दिला नाहीये. पण जे ओरिजनल गद्दार आहेत त्यांचं मला हसू येतंय. त्यांची खरी किंमत काय आहे ते ज्यांनी त्यांना फोडलं, अमिष दाखवली त्यांनी दाखवून दिली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version