आदित्य ठाकरेंनी घेतला नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार; मंत्रीपदाचा किमान …

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरेंनी घेतला नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार; मंत्रीपदाचा किमान …

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार आमदार संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी देखील नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

हे ही वाचा :  माझ्या संपर्कात चार आमदार; नारायण राणेंचा दावा

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून बंडखोरी केली. त्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना आणि चिन्ह यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरुपात पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. दोन्ही गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. उर्वरित आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत आहेत. अशातच पुन्हा एकदा नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत फूट पडणार का? अशी राजकीय चर्चा सुरु झाली.

उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिलाय? शिवसेना संपली आहे. ५६ आमदारावरुन सहा सातवर आले आहेत. त्यातील काही ऑन दी वे आहेत. ते कधीही सहभागी होती. माझ्या संपर्कात चार आमदार आहेत, असा दावा नारायण राणे पिंपरी चिंचवडमध्ये केला आहे. रोजगार मेळाव्यानंतर ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राणेंची ही सवयच आहे. त्यांना मागील १६ वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवाव. चार पक्षात जावून त्यांनी एकही काम केलं नाही. जाऊद्या राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा किमान फुलफॉर्म सांगावा, असं थेट आव्हान आदित्य यांनी दिल आहे.

दसरा मेळाव्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही सातत्याने उध्दव ठाकरे कुटुंबावर हल्ला करत असतात.

हे ही वाचा:

युक्रेनवर ३६ रॉकेटने हल्ला, १५ लाख लोकांच्या घरात अंधार तर, झेलेन्स्की म्हणाले, रशियाला जाणीवपूर्वक…

Vaibhav Naik : ‘मला अटक केली तरी भाजप, राणेंसमोर झुकणार नाही’ ; वैभव नाईकांचे सडेतोड उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version