आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा

अयोध्या नगरी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी तयार झाले आहे. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा

आयोध्या दौऱ्यात १२०० हुन अधिक शिवसैनिक सहभागी झाले आहेत. आता शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील १५ जून रोजी या दौऱ्यावर जाणार असून रामाचे दर्शन घेणार आहेत. शरयु नदीच्या काठावर होणाऱ्या आरतीत आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहे. हा दौरा राजकीय नसून अनेक शिवसैनिकांसोबत रामाचे दर्शन घेणार आहेत.

ठाणे, नाशिक, पुणे अशा अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक आयोध्याला निघाले आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत दिली आहे. अयोध्या नगरी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी तयार झाले आहे. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहे.

महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत आयोध्याला निघाले आहेत. जय श्री राम, जय भवानी अशा घोषणा देत रेल्वे स्थानकावर जल्लोष केला. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ठाणे शहरासह डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अनेक ठिकाणाहून शिवसैनिकांनी आपला प्रवास सुरु केला आहे.

शिवसेना हि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक पक्के करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे. शिवसेना गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे करते आहे शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आले नसले तरी विचाराच्या आधारावर शिवसेना उत्तर प्रदेशात पाय पसरू पाहते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा त्या अर्थाने फारच महत्वाचा ठरतो.

Exit mobile version