आदित्य ठाकरे भाजपाच्या मतांवर निवडून आले, आशिष शेलार यांचे विधान

आदित्य ठाकरे भाजपाच्या मतांवर निवडून आले, आशिष शेलार यांचे विधान

आजपासून राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या बाहेर विरोधकांनी आंदोलन केले. यात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”, त्याच बरोबर आमदार प्रकाश सुर्वे व मोहित कांबोज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

“पन्नास खोके एकदम ओक, आले रे आले गद्दार आले” राज्यसरकार विरुद्ध विरोधकांची घोषणा बाजी

आदित्य ठाकरे त्यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ते भाजपच्या मतांवर निवडून आले”, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर मोहित कांबोज यांनी केलेलं व्यक्तव्य गंभीर आहे. असे मत शेलार यांनी मांडले. आदित्य ठाकरे यांच्या वरळी येथील मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत आहोत असे आशिष शेलार यांनी सांगितले.

भाजप विरुद्ध धनंजय मुंडे

मोहित कांबोज यांनी केलेल्या ट्वीट वर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली, “अशाप्रकारे एखादं ट्वीट करुन विरोधी पक्षाला बदनाम कऱण्याचा आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं धोरण आहे. पण विरोधी पक्ष अशा कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. महाविकास आघाडी एकजुटीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहे,.”,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरु, आदित्य ठाकरेंचा सरकारला दणका

Exit mobile version