spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील : किशोरी पेढणेकरांचा विश्वास

आज स्वातंत्र्याच्या निम्मिताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले.

आज स्वातंत्र्याच्या निम्मिताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय केला असल्याचे म्हटले. राजकीय क्षेत्रातील घराणेशाहीचे प्रतिबिंब इतर क्षेत्रातही उमटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. घराणेशाहीचा तिरस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यांवर शिवसेनेच्या किशोरी पेढणेकर यांनीदेखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत ध्वजारोहण करतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर किशोरी पेढणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्या म्हणाल्या, आज शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ५० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा १०० व्या स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतुन येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. घराणेशाहीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधताय असा प्रश्न त्यांनी केला. भाजपमध्येही नेत्यांच्या मुलीला, मुलाला संधी मिळत असल्याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींचे वक्तव्य –
देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मी ज्यावेळी काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्देवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा :-

डुडलमधून भारतीय संस्कृती दर्शवत गुगलने दिली स्वातंत्र्यदिनाची भेट

CM Eknath Shinde यांच्या हस्ते ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहण

Latest Posts

Don't Miss