spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, हे मंत्रीमंडळ तर

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आजपासून पुन्हा शिवसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. तर आता आदित्य ठाकरे हे आजपासून शिवसंवाद यात्रेसाठी निघाले आहे. या यात्रेची सुरुवात नाशिकच्या इगतपूरीतून (Igatpuri) झाली असून यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalana) आणि बीडमधील (Beed) काही गावांमधून ही यात्रा जाणार आहे. त्याच बरोबर आदित्य ठाकरेंच्या सभा देखील या ठिकाणी होणार आहेत. इगतपुरीमध्ये यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून इगतपुरी येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, शिवसेनेत कोणताही गट नसून जे गेले ते गद्दार आणि राहिले ते शिवसैनिक असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांची आज शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने इगतपुरीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभे दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की “आपले मुख्यमंत्री २८ तास डाव्होसला गेले होते. खर्च झाले ४० कोटी, पण उद्योग किती आले हे अजून सांगू शकत नाहीयेत. इकडे-तिकडे आकडे सांगतात. मी तर त्यांना सांगेन की तुम्ही १०० लाख कोटीच सांगा. कुणाला किती शून्य आहेत त्यात ते कळणारच नाही. आम्ही फसत राहू, पण आज महाराष्ट्र फसणारा नाहीये”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पुढे आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळाबद्दल भाष्य करताना सांगितलं आहे की “राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाहीये. तुम्ही लिहून घ्या. हे मंत्रीमंडळ तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तारच होणार नाहीये. फक्त गाजरं देऊन ठेवलीयेत सगळ्या आमदारांना की तुला मंत्री बनवतो वगैरे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाहीये. या मंत्रीमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाहीये. हे सरकार चालणार कसं? हे सरकार नक्की कुणाचं आहे. दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं हा प्रश्न पडला आहे”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

हे ही वाचा : 

आज लता दीदींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील आठवणींच्या क्षणांचा परिचय घ्या जाणून

जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटवर गोपीचं पडळकरांचा पवारांना टोला, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची कूट नीती ….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss