Aditya Thackeray यांच्या निकटवर्तीयाची ED कडून तब्बल १७ तास चौकशी

काल दिवसभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडल्या आहेत. राज्यातील राजकारणाच्या सत्तांतराला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही अनेक घडामोडी या होतच आहेत.

Aditya Thackeray यांच्या निकटवर्तीयाची ED कडून तब्बल १७ तास चौकशी

काल दिवसभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडल्या आहेत. राज्यातील राजकारणाच्या सत्तांतराला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु अजूनही अनेक घडामोडी या होतच आहेत. अश्यातच आता ठाकरे गटाला मोठा धक्काच बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर या दोघांच्याही घरी काल ईडीने धाडी टाकल्या. त्यानंतर मुंबई पालिकेतील उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. तसेच काल टाकण्यात आलेल्या धाडी या कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांसंदर्भात होत्या. या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आदित्य ठाकरे यांचे खास आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घरी काल ईडी ची धाड पडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ ही उडाली आहे. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही ईडीची धाड पडली आहे. सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीचे अधिकारी हे सकाळी ९ वाजताच हजर झाले होते. सकाळी ९ वाजल्यापासून हे सर्व प्रकरण सुरु होते. रात्री दीड वाजता अधिकारी घराच्या बाहेर पडले. इतक्या वेळ ईडी चा तपास हा सुरु होता त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुरज चव्हाण यांच्या घरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १७ तास चौकशी केली आहे. ईडी च्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी घरातील कागदपत्रांची छाननी केली.

सुरज चव्हाण हे चेंबूरच्या के के ग्रँड इमारतीतील ११ व्या मजल्यावर राहतात. ईडीचे अधिकारी हे सकाळी ९ वाजताच त्यांच्या घरोई दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी रात्री १:३० वाजेपर्यंत सुरज चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्यासह घरातील सदस्यांची चौकशी केली आणि त्यानंतर साडे सोळा तासाने निघून गेले. तसेच यावेळी त्यांच्या इमारतीच्या खाली, घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता. कुणालाही आत सोडलं जात नव्हतं. तसेच कुणालाही बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. घरातील सदस्यांना फोन करण्यास मज्जाव करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

 

तर दुसरीकडे सुरज चव्हाण यांच्या घरी छापेमारी केल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या घरात बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळेस सरकार विरोधात त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. इडीचे अधिकारी हे चौकशी करून गेल्यानंतरही रात्री दीड वाजेपर्यंत शिवसैनिक तेथेच उपस्थित होते. त्यांनी सुरज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस देखील केली.

हे ही वाचा:

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version