spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जे गेले ते शेवटपर्यंत गद्दार; बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरेंची टीका

ही केवळ राजकीय गद्दारी नसून माणूसकीशी केलेली गद्दारी असल्याची टीका ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेतून बाजूला होत महाराष्ट्रात भाजप सोबत सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे पक्ष बांधणी आणि वाढीसाठी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सज्ज झाले आहेत. आज भिवंडीत शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंची ही तीन दिवसीय यात्रा असणार आहे.

हेही वाचा

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्लातून आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

 

“आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”. अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली. गद्दारीतून स्थापन झालेले हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार असंही ते म्हणाले. बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हा बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नसून माणूसकीशी केलेली गद्दारी असल्याची टीका ही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गद्दारी करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. हे सरकार लवकरच कोसळेल असाही विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

“सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. पण ते आपल्याला सोडून गेले, गद्दारी केली, हे तुम्हाला तरी पटणारं आहे का ? जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित असलेल्या युवांना केला. आम्ही कधी स्वतःच्या आमदार खासदारांवर नजर ठेवली नाही. ठेवला तो विश्वास आणि तो अंधविश्वास होता. तोच आज धोका देऊन गेला आहे. जे गेलेत त्यांच्यात शिवसेना कधीच नव्हती, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते बोलतात आम्ही उठाव केला, बंड केलं. पण त्यांनी गद्दारी केली, हा उठाव नाही. ते शेवटपर्यंत गद्दारच राहणार. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss