शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंची प्रकृती खालावली, पुढील दौरा रद्द

शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाल्या नंतर शिवसेना नेता (Shivsena) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्राची सुरवात केली.

शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंची प्रकृती खालावली, पुढील दौरा रद्द

मुंबई :- शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार स्थापन झाल्या नंतर शिवसेना नेता (Shivsena) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्राची सुरवात केली. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा हा सुरु होता परंतु त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे शिवसंवाद यात्रेचा पुढील टप्पा हा रद्द करण्यात आला आहे.

युवासेना (Yuvasena) प्रमुख आदित्य ठाकरे हे जळगाव, मालेगाव, सिन्नरच्या काही भागात दौरा करणार होते. ठाकरेंचा हा दौरा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला होता. उद्या ते जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. यामध्ये पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक असा दौरा करणार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकहून सिन्नर ला जाणार होते. त्यानंतर सिन्नर हुन भिवंडी शहरात मेळावा होणार होता. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आदित्यजी ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे.

राज्यात सत्तांतर झाले. भाजपसोबत एकत्र येत एकनाथ शिंद आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे हे स्वतः मैदानात उरले. सुरवातीला आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेद्वारे मुंबईतील अनेक भागात दौरे केले. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंनी वाहनांचा ताफा फिरवल्याचे मोठ्या प्रमाणत दिसून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिकांना एकत्रित करण्यासाठी शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात होते.

 

हे ही वाचा :-

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे “ही” अवस्था – रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

 

 

Exit mobile version