spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंचं वरळीकरांना पत्र; विकासकामे झाल्यानेच विरोधकांना वरळीचा हेवा

राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वरळीकरांना पत्र पाठवलं आहे.

राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वरळीकरांना पत्र पाठवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला ३ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. विकासकामं झाल्यानेच वरळीकरांना हेवा वाटतोय, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्राट म्हटलं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख न करता आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणूक लढवणारे आणि जिंकणारे ते पहिले ठाकरे ठरले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि ते विधानपरिषदेवर निवडून गेले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्री बनले. ३० डिसेंबर २०१९ रोजी आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पर्यटन, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री म्हणून शपथ घेतली.

आदित्य ठाकरे यांच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन पोहोचवत आहेत. मी वरळ ए प्लसचं वचन दिलं होतं आणि यामुळे अनेक कामं केली आहेत. अशाप्रकारची कामं केल्यानंतर विरोधकांना सुद्धा हेवा वाटावा असा विकास वरळीचा झाला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षाला वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो, असं इथल्या बॅनरवरुन दिसतं.

भाजपने या पत्रात आदित्य ठाकरे यांनी भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उल्लेख केलेला नाही. या पत्रात आदित्य ठाकरे लिहितात की, “गेल्या तीन वर्षात वरळीत हेवा वाटावा अशी प्रगती झालेली आहे. म्हणूनच विरोधकांना वरळीत यावंसं वाटत आहे. त्यामुळेच प्रत्येक पक्षाला वरळीत वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. लोकहिताचा विचार करणारं सरकार पाडलं. पण आम्हाला नि:स्वार्थपणे काम करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी आम्ही काम करतच राहू.”

हे ही वाचा:

Bhagatsingh Koshyari: भगतसिंग कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नितीन गडकरींची थेट शिवाजी महाराजांशी तुलना

Kedar Dighe Exclusive : हा एकमेव असा नेता होता कि त्यांनी स्वार्थ कधी बघितला नाही – केदार दिघे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss