Maharashtra politices : सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली, मात्र श्रीकांत शिंदेंच्या सभेला पोलिसांची परवानगी

Maharashtra politices : सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली, मात्र श्रीकांत शिंदेंच्या सभेला पोलिसांची परवानगी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आगामी काळात बंड करुन शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत ७ नोव्हेंबरला सिल्लोड मतदारसंघात सभेचं आयोजन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली. मात्र पोलिसांनी आदित्य ठाकरेंच्या सभेची परवानगी नाकारली आहे.

हेही वाचा : 

कच्चा बदाम फेम अंजली अरोराला वाढदिवसाच्या दिवशी मिळाली ‘हि’ खास भेट

ठाकरे यांच्या ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिल्लोडच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर त्याच वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला मात्र परवानगी देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. सिल्लोड हा मतदारसंघ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा आहे. आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही ७ नोव्हेंबरला सिल्लोडला सभा घेणार होते. त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असाही उल्लेख अब्दुल सत्तार यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. त्यामध्ये अब्दुल सत्तार हे जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यावरुन आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाकरे आणि सत्तार यांच्यातील वाद आणखीनच पेटलो होता.

Phone Bhoot Review : कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपट पाहायचा विचार करताय?, त्याआधी रिव्ह्यू नक्की वाचा

तर दुसरीकडे त्याचदिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे दोघांच्या सभा एकच दिवशी आहेत. आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची एकाच ठिकाणी सभा असल्याने कुणाच्या सभेला जास्त गर्दी होते याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे. शिंदे गटातील प्रमुख नेते असलेल्या अब्दुल सत्तार आणि शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे भेटी देणार आहेत. आता शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार

Exit mobile version