‘खोके सरकारचा आवाज जास्त आणि काम कमी’ जनआक्रोश आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा टोला

‘खोके सरकारचा आवाज जास्त आणि काम कमी’ जनआक्रोश आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा टोला

गेल्या काही दिवसांपासून वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज मावळमध्ये येणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात (पुणे) मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात करण्यात येणार येत आहे. खोके सरकारने वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठविल्यामुळे, महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात असल्याचे युवासेनेने म्हटले आहे. मावळमध्ये वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्प होणार होता. त्यामुळं पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे मावळमधील तरुणांचा रोजगार हिरवण्याचं काम शिंदे- फडणवीस सरकारने केला. हे खोके सरकार आवाज जास्त आणि काम कमी असा टोला आदित्य ठाकरेंनी भर आंदोलनात लगावला आहे.’खोके सरकारचा आवाज जास्त आणि काम कमी’ जनआक्रोश आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा टोला

हेही वाचा : 

कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंचे पारडे जड तर, शिंदे पितापुत्राच्या जबाबदारीत वाढ

पुढे आदित्य ठाकरेंनी म्हटले, ‘वेदांता-फॉक्सकॉनला आपल्या सरकारने १० हजार कोटींची सबसिडी देण्याचं नियोजन केलं होतं. १२०० एकर जागा देणार होतो. मात्र तरी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जिथे पाणी नाही, वीज नाही तिथे गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो, असंही आदित्य यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर खोके सरकार म्हणून पुन्हा टीका केला.

राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमिताने,’चूप’ चित्रपटाच्या ओपनिंग डेला केली इतकी कमाई

गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी चांगलं काम केलं. मी गुजरात किंवा केंद्र सरकारला दोष देणार नाही. पण दोष खोके सरकारचा आहे. तळेगावमध्ये काहीही कमतरता नाही. सर्वकाही असून प्रकल्प तिकडे गेला. मुख्यमंत्री शिंदेंना काहीच माहित नव्हतं. त्यांना वेदांता-फॉक्सकॉन काय हेच कळत नव्हतं. त्यांनी मला विचारलं असतं, तर मी त्यांनी सांगितलं असतं की, ५० खोके तिकडेही पाठवा अन् प्रकल्प आपल्याकडे आणा, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.

दापोली समुद्रकिनारी सापडलेल्या बोट संदर्भात तटरक्षक दलाचा खुलासा

Exit mobile version