spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१ लाख ५४ हजार कोटींचा ‘मविआ’ने राज्यात आणलेला प्रकल्प गुजरातला कसा वळला ? आदित्य ठाकरे संतप्त

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा सुरू होणार झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

चिनी अभिनेता ली यिफेंगला वेश्या व्यवसायामुळे अटक; प्रमुख ब्रॅंड्सनी देखील तोडले संबंध

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विट मधून म्हटले,” वेदांतचा प्रकल्प आहे तो गुजरातला गेला आहे. वेदांत आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रकल्प येणं हे चांगलंच आहे, मात्र आम्ही या प्रकल्पसाठी एक वर्षात अनेक बैठका घेतल्या. अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रकल्प येईल अशी काळजी घेतली. त्यासाठी आम्ही काम करत होतो.”

आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, ट्वीटने आले चर्चांना उधाण

माविआ सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठका घेतल्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही प्रयत्न करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद वादा प्रकरणी न्यायालयात ११ याचिका प्रलंबित

Latest Posts

Don't Miss