spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का; दिपाली सय्यद अखेर शिंदे गटात प्रवेश करणार

अशातच राज्यात शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. आर्थिक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ३० जून २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हा त्यांना ईडी कोठडी ठेवण्यात आले होते.

IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Posts

Don't Miss