spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

सध्याच्या राजकारणामध्ये राजकारणी नेत्यांमध्ये सुद्धा चुरस चालू असल्याचे पाहायला मिळते. राजकारणी बडे नेते देखील त्यांच्या त्यांच्यात सुद्धा कोण अधिक श्रेष्ठ आहे याचा विचार आधी करत आहे.

सध्याच्या राजकारणामध्ये राजकारणी नेत्यांमध्ये सुद्धा चुरस चालू असल्याचे पाहायला मिळते. राजकारणी बडे नेते देखील त्यांच्या त्यांच्यात सुद्धा कोण अधिक श्रेष्ठ आहे याचा विचार आधी करत आहे. त्याचबरोबर जनतेच्या पसंतीस आपण कसे आणि किती प्रमाणात आहोत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. कामापेक्षा कर्तृत्वावर जास्त लक्ष दिले पाहिजे हे आता जनता आणि जनतेसोबत आपले राजकारणी देखील विसरता चालले आहे.

सध्याच्या राजकारणात कामापेक्षा बॅनर बाजी आणि जाहिरातीला जास्त महत्व दिले जाते. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यात नवीन पायंडा घातला गेला. तो म्हणजे बॅनरबाजी आणि जाहिरात. कोणत्याही कामाला सुरवात केली की, या सरकारकडून खप मोठया प्रमाणात बॅनरबाजी आणि जाहिरातीचे प्रदर्शन भरवाले जाते. किंवा आपण म्हणू शकतो जागोजागी होल्डिंग्स आणि मोठे मोठे बॅनर हे लावले जातात. त्यामुळे जनतेचे लक्ष देखील त्या जाहिरातींकडे ओढले जाते आणि जनतेच्या मंदिर आणि ओक्यात सारखे तेच तेच विचार देखील चालूच राहतात. बॅनरबाजी आणि जाहिराती करण्याकडे काळ असतो. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकार त्यांनी केलेल्या कामाचे दाखले देताना दिसत असतात.

मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण त्या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्या जाहिरातीमध्ये जाहीर पणे “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” असे लिहिलेलं आहे. आणि त्यापुढेच असे देखील लिहिण्यात आले आहे की ,अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे अशी टॅग लिहिण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार,भारतीय जनता पक्षाला ३०.२ % आणि शिवसेनेला १६.२% जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.तर मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार,एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६. १% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३. २% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील ४९. ३% जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार… असे देखील नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे आता राजकारणात विरोधकांकडून काय आणि कशाप्रकारच्या प्रतिक्रिया येणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि त्याच बरोबर देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे हे या चूरसीमध्ये खरचं जास्त ठरतायत की ,काय हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तसेच आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणाच्या पारड्यात किती प्रेम मिळते हे समजणारच आहे.

हे ही वाचा:

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा नवा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

मुंबईतल्या जुहू चौपाटीवर ६ जण बुडाले तर स्थानिक नागरिकाने एकाला वाचवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss