क्लीन चिटनंतर किरीट सोमय्यांचा पुन्हा संजय राऊतांवर हल्लाबोल

क्लीन चिटनंतर किरीट सोमय्यांचा पुन्हा संजय राऊतांवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापल्याच दिसून येत आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी अपहार आणि शौचालय घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. संजय राऊत यांनीच किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबावर दोन्ही घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी युवक प्रतिष्ठानच्या (Youth Foundation) माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayander Municipal Corporation) आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. खोटी बिले (bills), पर्यावरणाचा ऱ्हास करुन शौचालय (Toilet) निर्माण केले असाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.

संजय राऊत यांचे व्याही आयएएस अधिकारी (IAS Officer) राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. राजेश नार्वेकर यांनीच शौचालय घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट दिल्याचा दावा किरीट सोमय्या केला आहे. पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी हा दावा केलाय. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवत हा दावा केला आहे. “संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आम्हाला, युवक प्रतिष्ठानला नोटीस दिली. निर्दोष असल्याचे सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला क्लिन चीट दिली. संजय राऊत तुमच्या व्याहींनी आम्हाला क्लिनचीट दिली आहे. १०० कोटींच्या घोटाळ्यात युवक प्रतिष्ठानची चूक नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर यांच्यावर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेल्याचा आरोप त्यांनी करुन दाखवावा,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

Uorfi Javed ला आली जीवे मारण्याची धमकी

Avatar 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाजवले अधिराज्य

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version